विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त; पाच जणांवर गुन्हा

। अहमदनगर । दि.16 जुलै । कोरपगांव तालुक्यातील तिळवणी येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या तिच्या कुटुंबातील पती, सासू , सासरे व दोन दिर यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावली. 14 जुलै 2021 रोजी पती, सासू-सासर्‍यांचा मानसिक, शारीरिक छळाला कंटाळून विवाहिता सोनाली धनंजय गायके (28) हिने तिळवणी येथे आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.

सोनाली हिचा विवाह झाल्यानंतर सहा महिन्यापासून आजतागायत माहेराहून पैसे आण म्हणून सासरवासीयांकडून वेळोवेळी तिचा मानसिक व शारीरिक छळ होत होता. छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून मृत सोनालीचे वडील दादासाहेब हरिभाऊ खटकाळे (52) लौकी, दहेगाव यांनी धनंजय भाऊसाहेब गायके (पती), भाऊसाहेब भागाजी गायके (सासरा), लिलाबाई भाऊसाहेब गायके (सासू), सागर भाऊसाहेब गायके (दिर), मनोज भाऊसाहेब गायके (दिर) यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post