। अहमदनगर । दि.06 जुलै । येथील अकोले ते धामणगाव आवारी रस्त्यावर धुमाळवाडी शिवारातून भागडा डोंगररांग नजिक पायथ्यापासून जाणार्या व रहदारीमुळे सतत वर्दळ असलेल्या डांबरी रस्त्याने शेतातील काम उरकून रविवारी सायंकाळनंतर घरी जात असताना प्रवासात बिबट्याने अचानक हल्ला करून एका 45 वर्षीय शेतमजूर तरुणास ठार केले.
धामणगाव आवारी येथील तरुण शेतमजूर संतोष कारभारी गावडे (वय 45) यांस प्राणास मुकावे लागले.पोलिस पाटील प्रणाली प्रशांत धुमाळ यांना दिल्यानंतर पोलिस व वनविभागाला कळवण्यात आले.
वनक्षेत्रपाल भाग्यश्री पोले, वनपाल पारधी, पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, सरपंच डॉ. रवींद्र गोर्डे, धामणगाव आवारीचे उपसरपंच गणेश पापळ व कर्मचारी घटनास्थळी धावले. पंचनामा करून अकोले ग्रामीण रुग्णालयातून शवविच्छेदन करण्यात आले.
धुमाळवाडी शिवारातून भागडा डोंगररांगेत खासगी व वनक्षेत्र असून शेती व जंगल आहे. या परिसरातून या शेतकर्यांची पाळीव कुत्री, शेळ्या, मेंढ्या, वासरे व जनावरांवर अनेकदा ताव मारून आपली भूक भागवली.
तेव्हा शेतकर्यांकडून बिबट्या हे करणारच असे म्हणत वन खात्याकढे फारशा तक्रारी केल्या नाहीत. पण आता तर या बिबट्यांने आपली भूक भागवण्यास माणसांवरच हल्ले सुरू केल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले.