कार व बोलेरो जीपच्या धडकेत जीपचालक ठार

। अहमदनगर । दि.11 जुलै । भरधाव वेगातील चारचाकी वाहन अल्टो कार रस्त्याच्यामध्ये असलेल्या दुभाजकावर धडकून रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन समोरून येणार्‍या बोलेरो जीपला धडक दिली. या धडकेत बोलेरो जीप चालक गंभीर जखमी होऊन ठार झाला. ही घटना नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात, नगर-पुणे रोडवरील हॉटेल महाज्योत जवळ घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कामरगाव शिवारातून नगर-पुणे रोडने भरधाव वेगात जाणार्‍या अल्टो कार (क्रमांक एमएच 45 एन4157) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता हयगयीने, बेफिकीरीने कार चालवून रस्त्याच्या दुभाजकावर धडकून कार रस्त्याच्या उजव्या बाजूला गेली

व समोरून येणार्‍या बोलेरो जीप (क्रमांक एमएच 16 एबी1087) च्या बोनेटवर व समोरील काचेवर धडकली. या अपघातात वहीद पठाण (राहणार चिंचविहिरे, राहुरी फॅक्टरी, राहुरी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकबर पठाण यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक मरकड करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post