कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथील घरफोडीत दागिन्यांसह रोकड पळवली

। अहमदनगर । दि.04 जुलै । घरामधील लोखंडी ग्रील तोडून किचन रूम च्या कार्टून अज्ञात चोरांनी खिडकीतून आत प्रवेश केला व घरातील एक लाख साठ हजार रुपये किमतीचे दागिने, 80 हजार रुपये रोख व आय सी आय सी आय बँकेचे एटीएम कार्ड चोरून नेला.

ही घटना नगर कल्याण रोड वरील शिवाजीनगर येथील हाऊस नंबर 29 केतन पार्क बालाजी मंदिराजवळ घडली याबाबतची अधिक माहिती अशी की महेश मोहरे वय 27 राहणार हाऊस नंबर 29 केतन पार्क बालाजी मंदिराजवळ शिवाजीनगर कल्याण रोड अ.नगर)

हे कुटुंबासह बाहेर गेले असतात कोणीतरी अज्ञात चोराने त्यांच्या घराच्या पाठीमागील लोखंडी ग्रील तोडून किचन रूम च्या खिडकीचे ग्रील उचकटून खिडकीतून घरात प्रवेश केला.

घरातील सामानाची उचकापाचक केली बेडरूममधील कपाटातील एक लाख साठ हजार रुपये किमतीचे दागिने 80 हजार रुपये रोख आय सी आय सी आय बँकेचे एटीएम कार्ड असा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी महेश मोहरे यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post