। अहमदनगर । पाथर्डी । दि.08 जुलै । सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत आपण कोरडगाव ता पाथर्डी हे गाव निवडले आहे, दुर्दैवाने कोरोना महामारीच्या संकटामुळे जरी खासदार निधी कोरोना संकट च्या विरुद्ध लढण्यासाठी वापरण्यात आला मात्र गावाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले.
पाथर्डी येथील सांसद आदर्श ग्राम योजनाअंतर्गत कोरडगाव येथील ग्राम विकास आराखडा व सांसद आदर्श ग्राम योजनेबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी प स सभापती गोकुळ दौंड, जि प सद्स्य राहुल राजळे,अभय काका आव्हाड,भाजपचे तालुका अध्यक्ष माणिकराव खेडकर, अजय रक्ताटे, गटविकास अधिकारी शीतल खिंडे ,व शासकीय अधिकारी ,सरपंच व ग्रामपंचायत सद्स्य कोरड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की कोरणा सारख्या साथीच्या रोगांमुळे खासदार निधी जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्याचा निर्णय देश पातळीवर झालाअसला तरी कोरडगावच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना या गावात राबवून विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे गाव्ही देतो.