छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली चिखलीत मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड.खेडेकर यांची भेट

। चिखली । दि.05 जुलै । छत्रपती संभाजीराजे यांनी आज मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांची चिखली निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती मिळाली.

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत करुन त्यांचा खेडेकर कुटुुबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकर यांची भेट राजकीय वर्तुळात उलथा पालथ करणारी भेट मानली जात आहे.

थोड्याच दिवसापूर्वी भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर आज मराठा सेवा संघाचे संस्थापक आणि संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांच्या बरोबर संभाजी महाराज यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याने राजकीय वातावण चांगलेच ढवळून निघाणार असल्याचे बोलले जात आहे.


यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर आदीसह मान्यवर उपस्थित होते अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.

 


Post a Comment

Previous Post Next Post