उपमहापौर गणेश भोसले यांची आयुक्तांकडे मागणी

अमृत भुयारी गटार योजनेचे काम पावसाळ्यात थांबवाव

उपमहापौर गणेश भोसले यांची आयुक्तांकडे मागणी


। अहमदनगर । दि.14 जुलै । अमृत भुयारी गटार योजनेच्या काम पावसाळ्यात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या योजनेचे काम पावसाळ्यात थांबवावे, अशी मागणी उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

मध्यवर्ती शहरामध्ये विविध ठिकाणी पाइप टाकण्यासाठी खोदकाम झाले आहे. त्यामुळे खोदकाम झाल्यानंतर ती माती रस्त्यावर टाकली जाते. पावसाच्या पाण्यामुळे चिखल होऊन रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत आहे.त्यामुळे या योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत थांबविण्याच्या सूचना उपमहापौर भोसले यांनी दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post