। अहमदनगर । दि.12 जुलै । जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्वयंपाक घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोराने शालेय पोषण आहार शिजविण्याचे नऊ हजार पन्नास रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना जामखेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की, जामखेडमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्वयंपाक घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी आतील अॅल्युमिनियमचे तीन मोठे पातेले, तीन लहान बादल्या, एक स्टीलची लहान टीप, एक लोखंडी कपाट असे नऊ हजार पन्नास रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.
याप्रकरणी मुख्याध्यापक गणपत जाधव (वय 56, राहणार खोसपुरी, तालुका नग. हल्ली राहणार खाडेनगर, जामखेड) यांच्या फिर्यादीवरून संशयित चंद्रकांत काळे (वय 35, राहणार गोरोबा टाकीमागे, कुंभारतळ, जामखेड) याच्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची गुन्ह्याची नोंद केली.