। मुंबई । दि.12 जुलै । अभिनेता सुनील शेट्टी ज्या इमारतीमध्ये राहत आहे ती इमारत सील करण्यात आली आहे. मुंबई येथील दक्षिण मुंबईच्या अल्टामाऊंट रोडवरील पृथ्वी अपार्टमेंट्स’ नावाच्या या इमारतीत कोरोना रुग्ण सापडल्याने इमारत सील करण्यात आली आहे.
पालिकेच्या नियमानुसार, एखाद्या इमारतीत पाचहून अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास त्या इमारतीला मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करून सील केले जाते. तर पाचहून कमी कोरोना रुग्ण असणार्या इमारतींमध्ये केवळ रुग्ण आढळलेला मजला सील केला जातो.
याच नियमानुसार सुनील शेट्टी यांची इमारत सील करण्यात आली. दरम्यान, सुनील शेट्टी किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

Tags:
Breaking