। अहमदनगर । दि.09 जुलै । अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडित झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. शुकवार दि.09 जुलै 2021 रोजी मध्यरात्री अहमदनगर शहर पाणी योजनेवरिल विज वितरण कंपनी कडुन होणार्या विज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मध्यरात्री 1.40 ते पहाटे 4.45 वाजले च्या दरम्यान विज पुरवठा खंडित झालेला होता.
काही मिनीटे जरी विज पुरवठा बंद पडला तरी, विज पुरवठा सुरू झाल्या नंतर मुळानगर, विळद पंपींग स्टेशन येथुन बंद पडलेला पाणी उपसा टप्या टप्या ने सुरू केल्यानंतर वसंत टेकडी येथे पुर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरु होण्यास किमान दोन ते तीन तासांचा अवधी जातो त्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य झालेले नाही.
त्यामुळे आज दि.09 जुलै 2021 रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ, इ . भागासह उपनगर भागास उशीराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
तरी वरिल सर्व परिस्थीती विचारात घेवुन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकसरिने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.