पाणी पिण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन पळवली

। अहमदनगर । दि.17 जुलै ।घरासमोर आलेल्या अनोळखी व्यक्तीने पाणी पिण्याच्या बहाण्याने 54 वर्षीय महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरीने ओरबाडून तोडून चोरुन नेली. ही घटना तारकपूर येथील प्रकाशपूर कॉलनी, सिंधी कॉलनी येथे घडली.

या बाबतची अधिक माहिती अशी की सारा देवदान वंजारे (वय 54, राहणार प्रकाशपूर, सिंधी कॉलनी, तारकपूर) या घरी एकट्या असताना त्यांच्या घरासमोर एक अनोळखी व्यक्ती आला आणि त्याने वंजारे यांना पिण्यासाठी पाणी मागितले.

 वंजारे त्याला पाणी देत असताना त्याने अचानकपणे त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरीने झटका मारुन ओढून तोडून चोरून नेली. वंजारे यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोराने तेथून पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पिंगळे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post