। अहमदनगर । दि.02 जुलै । केडगाव उपनगरातील भूषणनगर भागातील बंद घराचे सेफ्टी डोअर व मुख्य दररवाजाचे कुलूप तोडून घरातील सुमारे 1 लाख 4 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागीन्याची चोरी केल्याची घटना बुधवारी (दि.30) रोजी सकाळी 11 ते दि.1 जुलै दुपारी 2 च्या दरम्यान घडली.
याबाबत स्नेहल कांतीलाल भंडारी (वय 34, रा.भूषणनगर, केडगाव, नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. स्नेहल भंडारी या बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घराला कुलूप लावून आपल्या आईकडे गेल्या होत्या.
गुरुवारी दि.1 जुलै रोजी त्या दुपारी 2 च्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना घराचे सेफ्टी डोअर तसेच मुख्य दरवाजाचा कडी -कोयंडा तोडल्याचे आढळून आले. तसेच त्यांनी घरात जावून पाहिले असता बेडरुममधील दोन गोदरेजच्या कपाटाची उचका पाचक झालेली दिसली.
या कपाटामध्ये त्याचे 1 लाख 4 हजार 500 रुपये किंमीचे सोन्याचे दागीने व काही रोख रक्कम ठेवलेली होती. ती चोरट्यांनी चोरुन नेली. याबाबत त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भा.द.वि.कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्हयाची नोंद केली आहे.