। अहमदनगर । दि.04 जुलै । नगर शहरातून शुक्रवारी दिवसभरात दोन युवतींसह एकूण तीन जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संबंधितांच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बेपत्ता होण्याची ही तिन्ही प्रकरणे वेगवेगळी असली तरी त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचीही माहिती घेतली जात आहे.
एकाच दिवशी अवघ्या काही तासांमध्ये हे तिघेही बेपत्ता झाले आहेत. यात एका सरकारी कर्मचार्यासह दोन युवतींचा समावेश आहे. 53 वर्षीय सरकारी कर्मचारी नोकरीसाठी घरातून निघाल्यानंतर घरी परतला नसल्याचे नातवाईकांकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे. तर एक 20 वर्षाची युवती काटवन खंडोबा परिसरातून शुक्रवारी 12.30 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली आहे.
मूळचे जामखेड येथील ही युवती असल्याचे समजते. आणखी एक युवती नगर-पुणे रोडवरील इलाक्षी शोरुम जवळून बेपत्ता झाली आहे. मूळची फैजाबाद (उत्तरप्रदेश) येथील ही युवती सध्या नगर-पुणे रोडवरील सीना नदी पुलाजवळ राहात होती. शुक्रवारी दहा वाजता ही युवती बेपत्ता झाल्याचे नातवाईकांकडून पोलिसांना सांगण्यात आले. नगर शहरातून एकाच दिवशी तीन जण बेपत्ता झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तिघांचाही शोध सुरु असल्याचे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.