। अहमदनगर । दि.12 जुलै । गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर तात्काळ कमी करण्याकरता अहमदनगर जिल्हा काँग्रेस व अहमदनगर शहर व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून सायकल रॅली काढण्यात आली होती.
यामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेसचे मा. शहर जिल्हाध्यक्ष व माजी महापौर दीप चव्हाण, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, ज्येष्ठ नेते जयंतराव वाघ, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के,
युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब धोंडे, उपसरपंच अंकुश शेळके पाटील, युवक कार्याध्यक्ष राहुल उगले, मनोज गुंदेचा, भूषण शेळके, किसन मोरे, विलास खडके, बाबासाहेब सय्यद, रमेश ठोंबरे, अनशा बापू म्हस्के,
शंकरराव साठे, मच्छिंद्र साठे, किरण पाटील, विक्रांत अब्दुले, तुषार मोरे, अमन तिवारी, अजिंक्य शिंदे, गणेश भोसले, विशाल कळमकर, चिरंजीव गाढवे, सुजय गांधी, प्रमोद अबुज, उबेद शेख, शंकर जगताप, प्रवीण गिते, सोशल मिडीया विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, आ.डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील सात वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किंमती सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करीत आहे.
उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याची नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता 850 रुपयांची गॅस सिलिंडर घेणे या गरीब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भूतान बांगलादेशाला पेट्रोल 30 रुपये लिटर व डिझेल 22 रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र तेच पेट्रोल, डिझेलसाठी शंभर रुपये मोजावे लागतात.
मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तूंची महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करून ठेवले आहे. त्याच्याविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. मोदी सरकारने गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर तात्काळ कमी करून जनतेला दिलासा दयावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस व युवक काँग्रेस च्यावतीने करण्यात आली.