। अहमदनगर । दि.07 जुलै । काेरोनामुळे पोलिसांवर अतिरिक्त भार पडला असतानाही ते उत्कृष्टपणे काम करत आहेत. नगर तालुका पोलिस स्टेशनच्या माध्यमातून पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनीही उत्कृष्ट काम केले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर तालुका पोलिस स्टेशनची उत्कृष्ट पोलिस स्टेशन म्हणून निवड करत त्यांच्या कार्याची दाखल घेतली.
पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी केले. जिल्हा पोलिस अधिक्षक कार्याकायाने नगर तालुका पोलिस स्टेशनची नुकतीच जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोलिस स्टेशन म्हणून निवड झाली.
याबद्दल तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र सानप यांचा विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते. पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप म्हणाले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.
Tags:
Ahmednagar