पोलिसांना टीप दिल्याच्या संशयावरुन बेदम मारहाण

। अहमदनगर । दि.17 जुलै । स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना टीप देऊन छापा टाकायला लावल्याच्या संशयावरून राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे पाच जणांनी मिळून दोघा जणांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली.

गिरन तांबोळी, आदनान तांबोळी, पिरमोहंमद तांबोळी, सोनू उर्फ अरबाज तांबोळी, एयाज तांबोळी (सर्व रा. सात्रळ, ता. राहुरी) या पाच जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आसावा याला म्हणाले, तुम्ही आमची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना टीप दिली

 आणि छापा टाकायला लावला, असे म्हणून आसावा व गीते यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या मारहाणीत अंकित आसावा आणि योगेश गिते हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी अंकित आसावा यांच्या फिर्यादीवरुन पोलिस ठाण्यात गिरन तांबोळी, आदनान तांबोळी, पिरमोहंमद तांबोळी, सोनू उर्फ अरबाज तांबोळी,एयाज तांबोळी (सर्व रा. सात्रळ, ता. राहुरी) या पाच जणांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ जायभाय करीत आहेत. या घटनेतील दोन आरोपी अटक केले असून, अन्य आरोपी पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post