बूथ हॉस्पिटल मध्ये डॉक्टर डे साजरा
। अहमदनगर । दि.05 जुलै । जेव्हा-जेव्हा नगर जिल्ह्यावर महामारीचे संकट आले तेव्हा बूथ हॉस्पिटलने नागरिकांच्या आरोग्याची मोफत सेवा केली. गेल्या दीड वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या संकट काळात पहिल्या रुग्णां पासून आरोग्य सेवा देण्याचे काम प्रमाणिक पणे बूथ हॉस्पिटलच्या डॉक्टर,परिचारिका व कर्मचारी यांनी केले.
त्यामुळेच कोरोना रुग्णांनाचा व समाजाचा आरोग्य सेवेबद्दल विश्वास संपादन करू शकलो.बूथ हॉस्पिटल मध्ये हजारो रुग्ण मोफत उपचार घेऊन सुखरूप आनंदाने घरी परतले, आपल्या जिवाची पर्वा न करता बूथ हॉस्पिटल मधील टीम ने केलेले काम कौतुकास्पद आहे त्याचे श्रेयही या सर्व टीमला जाते.कोविड काळात बूथ हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर वरदान ठरले असल्याचे प्रतिपादन बूथ हॉस्पिटलचे प्रशासन मेजर देवदान कळकुंबे यांनी व्यक्त केले.
बूथ हॉस्पिटल येथे जागतिक डॉक्टर डे केक कापून साजरा केला या वेळी सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रशासकीय अधिकारी मेजर देवदान कळकुंबे,डॉ.शेहनाज आयुब,डॉ.अनिल जाधव, डॉ.मीना फुके, डॉ.सिबोन, डॉ.संजय राठोड, डॉ.राकेश थोरात,डॉ.जानवी पेहरकर,डॉ.जयश्री ढाकणे आदी उपस्थित होते
Tags:
Ahmednagar