देवळालीत दारू अड्ड्यावर छापा, एक लाख ऐंशी हजारांचे साहित्य जप्त

। अहमदनगर । दि.10 जुलै । देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्यावर शुक्रवारी राहुरी पोलिसांनी छापा टाकून एक लाख ऐंशी हजार रुपयांचे साहित्य व रसायन जप्त केले. गुप्त माहिती वरून पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ व राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही संयुक्त कारवाई केली,दरम्यान पोलिसांनी कारवाई करीत हा दारू अड्डा उद्धवस्त केला.


देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू तयार केली जात आहे,अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्या हातभट्टी दारू अड्ड्यावरील सहा हजार लिटर कच्चे रसायन कच्चे रसायन ११८ लिटर तयार गावठी दारू तसेच २०० किलो नवसागर असा एकूण एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

 

याप्रकरणी उपविभागीय पाेलिस अधिकारी नितीन शिरसाठ यांच्या फिर्यादीनुसार आशाबाई बाळासाहेब गायकवाड,मयूर अनिल गायकवाड, सतीश वसंत गायकवाड, बापू भास्कर गायकवाड, मंगल बापू गायकवाड आणि एक अज्ञाताविरोधात राहुरी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post