रिक्षाचालकांचे महामंडळ स्थापन करू : आमदार संग्राम जगताप

मित्रमंडळाच्या वतीने घरेलू कामगार 

यांना किराणा वाटप करण्यात आला

। अहमदनगर । दि.03 जुलै । समाजाच्या दृष्टीने रिक्षाचालक हा महत्त्वाचा घटक आहे, व्यवसाय करत असताना रिक्षाचालकांचा प्रामाणिकपणा वारंवार दिसून येते आहे. रिक्षाचालकांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केला.


आमदार संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने व घरेलू कामगारांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, अजिंक्य बोरकर, अभिजित खोसे, दत्ता वामन, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, विलास कराळे, साधना बोरुडे, बाळासाहेब जगताप, संतोष ढाकणे, जय लोखंडे, घनश्याम सानप, साहेबांन जागीरदार, भूषण गुंड आदी उपस्थित होते.


उपमहापौर भोसले म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक नागरिक भयभीत झाला आहे. त्यांना आधार देण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले. त्यांनी केलेले काम हे कौतुकास्पद आहे आपल्या जीवाची पर्वा न करता या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार व्हावे यासाठी अहोरात्र झटत होते, रिक्षाचालकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न दूर करण्यासाठी आमदार संग्राम जगताप ये प्रयत्नशील आहेत, असे सांगितले.

 

Post a Comment

Previous Post Next Post