कापड बाजारातून महिलेची पर्स ऐवजासह लांबवली

। अहमदनगर । दि.07 जुलै ।नगरच्या कापडबाजारातील सारडा लेन येथे असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने महिलेच्या हातातील पर्स आतील तीस हजार रुपयाच्या ऐवजासह चोरून नेली. 

 

याबाबतची अधिक माहिती अशी की शर्मिला साळवे (वय 62, रा.एमआयडीसी,  अ.नगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. 6) दुपारी कापड बाजारात खरेदी करण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने साळवे यांची पर्स चोरून नेली. 

 

पर्समध्ये तीन हजार रुपयांची रोख रक्कम, एटीएम कार्ड, नगर अर्बन बँकेच्या दिल्लीगेट शाखेच्या लॉकरची चावी व आधारकार्ड असा 30 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी पोलिसांनी साळवे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलिस नाईक पठारे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post