। अहमदनगर । दि.06 जुलै । घराच्या स्टोअर रूमच्या दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला व आतील सामनाची उचकापाचक करून घरातील वीस हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना भिंगार कॅम्प परिसरातील लष्करी हद्दीतील तारापूर क्लब आर्मी एसीसी अँड एस येथे घडली.
याबाबतची याबाबतची अधिक माहिती अशी की, लेफ्टनंट कर्नल प्रतीक मलिक (राहणार बंगला नंबर 169/2, जुने तारापूर क्लब, आर्मी एसएससी अँड एस) यांच्या घराच्या स्टोअर रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला व आतील सामानाची उचकापाचक केली.
आतील पाच हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, पाच हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, सहा हजार रुपये किमतीचे बूट, चार हजार रुपये किमतीची लेडीज पर्स तसेच बुलेटची चावी असे सुमारे वीस हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.
याप्रकरणी पोलिसांनी प्रतीक मलिक यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार दहिफळे करीत आहेत.