चाकूचा धाक दाखवून महिलेचे दागिने लुटले

। अहमदनगर । दि.14 जुलै । दोन अनोळखीनी घरात घुसून महिलेस चाकूचा धाक दाखवून घरातील सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने बळजबरीने चोरून गेले ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की उमा शेलार (वय 27 राहणार पाटील आळी, पिंपळगाव पिसा ) या घरात एकटी असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आलेल्या व देवीसाठी चोळी पातळ दे असे म्हणून तर आत प्रवेश केला व त्यांना चाकूचा धाक दाखवून

स्वयंपाक घरातील डब्यातील सोन्याचे तीन मंगळसूत्र, कानातील टॉप्स, दोन नथ, बदाम, नेकलेस, रोकड असा एक लाख 19 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास फौजदार बोराडे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post