जमीन व्यवहारातूनच दातीर यांची हत्या

। अहमदनगर । दि.07 जुलै । बहुतर्चीत ठरलेल्या सामाजिक कार्यकर्ते रोहिदास दातीर हत्यांकाड प्रकरणामध्ये खुनाचे नेमके कारण पोलिसांकडून चार्जशिटमध्ये मांडण्यात आले आहे. गणेगावात जमीन प्रकरणातूनच ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी पसार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्याकडून राजकीय नेते, व्यवसायिक, शासकीय अधिकारी यांच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या.

त्यातच वांबोरी येथील कान्हू गंगाराम मोरे यांच्याशी रोहिदास दातीर यांचे संबंध बिघडलेले होते. मोरे ज्या ठिकाणी व्यवहार करीत होता. त्या ठिकाणी रोहदास दातीर यांची तक्रार आर्ज दाखल होते.

अनेक प्रकरणामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयात दातीर यांच्याकडून कागदोपत्रांसह खटले दाखल करण्यात आले होते. यातर मोरे व दातीर यांच्यातील गणेगोव येथील भूखंडावरुन वाद विकोपाला गेले.

दि.6 एप्रिल 2021 रोजी कान्हू मोरे याने साथीदारांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले. राहुरी शहरातील जाणार्‍या रोहिदास दातीर यांचे कान्हू मोरे व साथीदारांनी स्कार्पिओ गाडीतून अपहरण केले.

दरडगाव थडी परिसरातील वन जंगलामध्ये दातीर यांना मारहाण करण्यात आली. जबर मारहाणीत दातीर यांचा मृत्यू झाला. दातीर खून प्रकरणाचा उलगडा झाला असून, आता न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post