महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ बीजभांडवल आणि विशेष घटक योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर कऱण्याचे आवाहन

। अहमदनगर । दि.10 जुलै ।महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सन 2021-22 मध्‍ये अहमदनगर जिल्‍ह्यास बीज भांडवल योजना आणि विशेष घटक योजनेसाठी  कर्जप्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बीज भांडवल योजनेसाठी 47 तर  विशेष घटक योजनासाटी 40 कर्जप्रकरणांचे उद्दिष्‍ट असून अनु‍सूचित समाजातील इच्‍छुक अर्जदारांकडुन कर्ज प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहेत. 

विशेष घटक व बीज भांडवल योजनेचा फायदा घेण्‍यासाठी अर्जदार हा महार, नवबौध्‍द, बौध्‍द, खाटीक, बुरूड, मेहतर, वाल्‍मीकी समाजातील असावा. अर्जदाराने अथवा अर्जदारांच्‍या पती/पत्‍नीने यापुर्वी महामंडळाच्‍या कुठल्‍याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच कर्ज प्रस्‍तावासोबत जातीचा दाखला, उत्‍पन्‍नाचा दाखला, रेशनकार्ड, मतदान, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, कोटेशन, लाईटबील, टॅक्‍सपावती भाडेकरारनामा किंवा उतारा , व्‍यवसायाचा ना हरकत दाखला व शाळेचा दाखला जोडणे आवश्‍यक आहे. 

महामंडळाच्‍या विहीत नमुन्‍यातील अर्ज कार्यालयीन वेळेत सकाळ 9.30 ते 6.15 वाजेपर्यंत उपलब्‍ध होतील. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या 123, वी हालिमा मेन्‍शन, सर्जेपुरा, अहमदनगर या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्‍हा व्‍यवस्‍थापक सौ. वाय. एच. काकडे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post