। अहमदनगर । दि.15 जुलै । जिओ कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून आगरकर मळा येथील एकास अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले व त्याच्या बँक खात्यातून 99 हजार रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना आगरकर मळा येथील शिवाजी रोडवर घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की शरद कापकर (वय 49, राहणार शिवाजीरोड, आगरकर मळा, अहमदनगर) यांना 7866970733 या फोन नंबरवरून एक फोन आला. समोरील व्यक्तीने मी जिओ कंपनीचा प्रतिनिधी बोलतो, असे सांगून कापकर यांना एएनवाय-डीआयएसके अॅप डाउनलोड करून घेण्यास सांगितले. त्यानुसार कापकर यांनी हे अॅप डाऊनलोड केले असता
त्यांच्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील खाते क्रमांक 1111802532 या खात्यातून एकूण 98 हजार 999 रुपयाची रक्कम त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर काढून घेतली व त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी शरद कापकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याचा नोंद केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.