इपीएस 95 पेन्शनधारकांनी घेतली खा.विखेपाटलांची भेट

। अहमदनगर । दि.03 जुलै ।  इपीएस 95 पेन्शनधारकांचा पेन्शनवाढीचा प्रश्नाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 4/5 वर्षापासून अनेक आंदोलने केली. परंतु अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

4 मार्च 2020 रोजी शिष्टमंडळाने खा.हेमा मालिनी समवेत राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी सविस्तर चर्चा झाली व पेन्शनवाढीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले.

त्यांचे मंत्री जितेन्द्रप्रसाद यांनी कामगार मंत्री,अर्थमंत्री यांना तशा सूचना दिल्या अद्याप निर्णय झाला नाही.1 जून रोजी देशातील लाखो पेन्शनर्स यांनी उपोषण केले.आता हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात मार्गी लागावा म्हणून सर्व खासदारांना भेटून या प्रश्नी लक्ष घालावे .

यासाठी देशातील पेन्शनधारक आमरण उपोषण करणार आहेत व सामुहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आल्याचे सर्व खासदार,कामगार मंत्री,अर्थमंत्री यांना देण्यात येणार आहे.त्यामुळे राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली खा.सुजय विखे पाटील यांची पेन्शनर्स शिष्टमंडळाने विळद घाट अहमदनगर येथे भेट घेतली.निवेदन दिले व पंतप्रधान यांची भेट घालून द्यावी व प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.खा.सुजय विखे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले.

शिष्टमंडळामध्ये राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर,उपाध्यक्ष संपत  समिंदर,श्रोगोंडा तालुकाध्यक्ष भगवंतराव वाळके,उपाध्यक्ष जयसिंग शेंडे,नारायण इराबत्तीन,दत्तात्रय थोरात,निवृत्ती क्षीरसागर,रायभान तुपे,सखाराम भोसले,हरिभाऊ आंबेडकर,आदी सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post