भापकर यांच्या निधीतून आगडगावसाठी 5 लाख

। अहमदनगर । दि.06 जुलै । नगर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भापकर यांच्या शेष निधीतून आगडगाव (ता. नगर) देवस्थान येथे शौचालय व इतर आरोग्यविषयक कामासाठी 5 लाख रुपये देण्यात आले.

या कामाचा शुंभारभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके याच्या हस्ते नुकताच पार पडला. भापकर यांनी नगर तालुक्यात एक वर्ष म्हणून उपसभापती म्हणून कार्य करताना तालुक्यातील अनेक गावात भरीव निधी दिला.

आगडगाव गेल्या चार ते पाच वर्षात भैरवनाथांचे जागृत देवस्थान म्हणून जिल्ह्यात नावारुपास येत आहे आणि त्यासाठी निधी देण्याचा निर्णय भापकर यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे गोविंद मोकाटे, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, रामदास भोर, प्रवीण कोकाटे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत,

आगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे, उपसरपंच संतोष शिरसाठ, ग्रामसेवक पोपट गावडे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे, साहेबराव गायकवाड, नितीन कराळे, प्रल्हाद खाडे, दीपक गुगळे, बाबासाहेब बोरुडे, दिलीप गायकवाड, संभाजी कराळे, भाऊसाहेब पालवे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी देवस्थानसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. देवस्थानसाठी भविष्यात मोठा निधी उपलब्ध करून देऊ.

Post a Comment

Previous Post Next Post