। अहमदनगर । दि.13 जुलै । बंद दुकानाचे शटर कशाने तरी उचकाटून अज्ञात चोराने आत प्रवेश केला व दुकानातील विवो सॅमसंग कंपनीचे 26 मोबाईल व अॅक्सेसरीज असा दीड लाख रुपये किमतीचा माल चोरून नेला.
ही घटना कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील प्रगती मोबाईल शॉपी येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, प्रमोद चव्हाण (वय 35, राहणार धालवडी, तालुका कर्जत) यांचे कुळधरण येथे प्रगती मोबाईल शॉपी नावाचे मोबाईलचे दुकान आहे. या दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोराने कशानेतरी उचकातून आत प्रवेश केला.
आतील सामानाची उचकापाचक करून आतील विवो कंपनीचे सहा मोबाईल व सॅमसंग कंपनीचे वीस मोबाईल असे एकूण सव्वीस मोबाईल व मोबाईलच्या अॅक्सेसरीज असा एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा माल चोरून गेला. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक यमनर करीत आहे.