‘त्या’ 11 पोलिस कर्मचार्‍यांचे निलंबन मागे

। अहमदनगर । दि.08 जुलै ।  जिल्ह्यातील बहुचर्चित बनावट डिझेल प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसह एकूण 11 जणांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांना जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.



पोलिस उपनिरीक्षक सुनील हरिभाऊ सूर्यवंशी यांना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात, भरत डंगोरे यांना कर्जत पोलिस ठाण्यात, गणेश निवृत्त डहाळे यांना पारनेर पोलिस ठाण्यात, राजाराम शिवराम शेंडगे यांना नेवासा पोलिस ठाण्यात, अरविंद रमेश भिंगारदिवे यांना पाथर्डी पोलिस ठाण्यात, अजित बाजीराव घुले यांना अकोले पोलिस ठाण्यात, संदीप गुलाब धामणे यांना जामखेड पोलिस ठाण्यात, विनोद प्रभाकर पवार यांना बेलवंडी पोलिस ठाण्यात, 



राजू तुकाराम चव्हाण यांना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात, प्रवीण दिलीप अंधारे यांना कर्जत पोलिस ठाण्यात, शंकर गुलाब रोकडे यांना पाथर्डी पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे.या कर्मचार्‍यांची खातेनिहाय चौकशी व कारवाईच्याअधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात निलंबन मागे घेण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post