96 टक्के घेऊन संकेत जाधव शाळेत प्रथम
। अहमदनगर । दि.17 जुलै । निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाचा एस.एस.सी. इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षा घेण्यात आल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन करुन त्यांना गुण देण्यात आले आहे.
शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम- संकेत मनोहर जाधव (96.20 टक्के), द्वितीय- तृप्ती गुलाब गायकवाड (87.20 टक्के), तृतीय- साहिल विजय कदम (86.80 टक्के) यांनी येण्याचा बहुमान पटकाविला. गुणवंत विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, मुख्याध्यापक किसन वाबळे, गोकुळ जाधव, सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, उद्योजक दिलावर शेख,
कोंडीभाऊ फलके, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ जाधव, अनिल डोंगरे, अंशाबापू फलके यानी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षक काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तुकाराम खळदकर यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags:
Ahmednagar