मराठा आरक्षणाबाबत अंदोलनाची भूमिका ठरणार : संभाजी दहातोंडे

 

नगर, (दि.12 सप्टेंबर) :  सरकारने न्यायालयात योग्य प्रमाणात बाजू न मांडल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन उभारले जात आहे. त्यासाठी शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. नगर जिल्हयताील कार्यकर्त्यांची रविवारी दि.13 रोजी बैठक होणार असल्याची माहिती शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दहातोंडे यांनी सांगितले आहे.



दहातोंडे म्हणाले, मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे. मराठा आरक्षणाचा अनेक वर्षाचा लढा, लाखोंचे मराठा क्रांती मोर्चे, त्यासाठी तरुणांचे गेलेले बलिदान केवळ सरकारच्या ढीलाईच्या भूमिकेमुळे हे घडले आहे. मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांनी सरकारला वारंवार सांगूनही सरकारन लक्ष दिले नाही. 



त्यामुळे सरकारच्या विरोधात मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. त्यासंदर्भात (शुक्रवारी) मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील समन्वयांची बैठक झाली. त्यात राज्यभर अंदोलन करण्याचे ठरले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर रविवारी नगरला सरकारी विश्रामगृहावर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. जिल्हाभर होणार्‍या आंदोलनाची या बैठकीत दिशा ठरणार आहे. कार्यकर्त्यानी बैठकीला उपस्थित रहावे असे अवाहन संभाजी दहातोंडे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post