फटाका विक्री परवाना ऑनलाईन करावे : श्रीनिवास बोज्जा यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी



नगर, (दि.15 सप्टेंबर) : सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे फटाका विक्री परवाना ऑनलाईन करण्यात यावी अशी मागणी दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व  जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.


नुकतेच उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री यांनी सध्याच्या परिस्तिथीचा विचार करून संपूर्ण उत्तरप्रदेश राज्या मध्ये यंदाच्या दिवाळी सणा साठी फटाका विक्री परवाना ऑनलाईन करण्याचे आदेश दिले असून सदर परवाने एक महिना अगोदर देण्यात यावे असेही आदेश देण्यात आले. 

 

त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ही सध्याचे परिस्थिती चे गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावा मुळे व्यापारी वर्ग कमकुवत झाला आहे. फटाका व्यवसाया वर लाखो कुटुंब अवलंबून आहेत अशा परिस्थिती मध्ये व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे सुलभ व्हावे या करिता प्रशासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे. 

 

हा व्यवसाय ठराविक कालावधी साठी असून याच कालावधी मध्ये व्यापाऱ्यांना मदत होणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य न केल्यास व्यापारी रस्त्यावर येतील. हा परवाना एक महिना अगोदर दिल्यास ग्राहकांना ही सोयीस्कर रित्या फटाका खरेदी करता येईल व सोशल डिस्टन्सिंग च्या नियमाचा भंग होणार नाही. 

 

परंतु कमी वेळात परवाना दिल्यास व्यापाऱ्यांना अनेक संकटाना तोंड दयावे लागेल याची गांभीर्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश सरकारने फटाका विक्री परवाना ऑनलाईन केले व एक महिना अगोदर परवाना देण्याचे आदेश दिलेत, त्या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात फटाका विक्री परवाना संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन करण्यात यावे व सदरचा परवाना एक महिना अगोदर देण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दयावा अशी मागणी दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post