सुशांत, रिया आणि कंगना या सगळ्यातून बाहेर पडा,
आसपास आणखी गंभीर समस्या आहेत
मुंबई, (दि.09 सप्टेंबर) : अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि सरकारी संस्थांचे खासगीकरण यावरुन राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक गंभीर समस्या असून त्याकडे लक्ष केंद्रीत करावे आसे ते ट्विटमध्ये म्हंटले आहे. इतर समस्यांकडे केंद्राने लक्ष द्यावे सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि कंगना राणौत या वादातून बाहेर पडा असा सल्लाही त्यांनी यामध्ये दिला आहे.
याबाबत माजिद मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एअरपोर्ट, रेल्वे यांचे खासगीकरण केले जात आहे. केंद्र सरकार बैलगाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत आहे का? जे लोक सध्या सत्तेत आहेत त्यांना देशाला पुन्हा मागे घेऊन जायचं आहे का? पैशाच्या बळावर त्यांना सुट्ट्या एन्जॉय करायच्या आहेत. सुशांत राजपूत, रिया आणि कंगना या सगळ्यातून बाहेर पडा, आसपास आणखी गंभीर समस्या आहेत त्याकडे लक्ष द्या अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारला फटकारलं आहे.
कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत केलेल्या तुलनेचा माजिद मेमन यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, ज्या कोणाला मुंबई, महाराष्ट्र पीओकेसारखा वाटत असेल, तसेच तालिबान राज्य चाललं आहे असं वाटतंय त्यांनी स्वत:हून अशा धोकादायक ठिकाणाहून लांब गेले पाहिजे. भाजपा अशा लोकांना प्रोत्साहन देत आहे आणि जनतेच्या पैशातून त्यांना सुरक्षा देत आहेत असं सांगत राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी कंगना राणौत आणि भाजपाला फटकारलं आहे.