पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवानिमित्त दरेवाडीत रक्तदान

 


नगर, (दि.16 सप्टेंबर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तने दरेवाडी (ता.नगर) येथे रक्तदान शिबिरराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबीरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मोदी यांचा वाढदिवस हा 'सेवा सप्ताह' म्हणुन वारकरी भवन या ठिकाणी श्री स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने साजरा करण्यात आला. तसेच यावेळी जनकल्यान रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबीरात पंतप्रधान मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले, यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, दरेवाडीचे सरपंच अनिल करांडे, जनकल्यान रक्तपेढीचे डॉ.विलास मढीकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष बेरड, विजय सयाजी बेरड, गोरख गवळी, आकाश निमसे, विठ्ठल लोखंडे, प्रशांत बेरड, अरुण सायंम्बर, राजू म्हस्के, पोपट बेरड, सुरेश फाळके, भाऊ करांडे, अविनाश साळुंके, संभाजी मोरे, सारंग सालवे, सागर जगताप, प्रमोद जगता, संजय कुलट,जयश्रीताई करांडे, सौ.जगताप आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post