शेडगावच्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नगर, (दि.13 सप्टेंबर) :  संगमनेर येथील शेडगावातील  आकाश सदाशिव आंधळे (वय 26) याचा शुक्रवारी विजेच्या जोरदार धक्क्याने मृत्यू झाला आहे.

आकाश हे आपल्या राहत्या घरात सायंकाळी  बल्ब लावण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. घराच्या जवळपासच्या नागरीकांनी त्याला येथील घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती.

आकाशवर कुटुंबाची जबाबदारी होती. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. त्याच्यामागे आई, भाऊ, बहीण व आजी-आजोबा असा परिवार आहे.  

पोलिस पाटील दिलीप सांगळे यांनी आश्‍वी पोलिसांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post