नगर-मनमाड दरम्यान रेल्वेच्या दुहेरी मार्गासह विद्युतीकरण प्रगतीपथावर



नगर, (दि.13 सप्टेंबर) : नगर-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरु असून अनेक वर्षांपासून एकेरी असलेला हा मार्ग दुहेरी झाल्याने रेल्वेप्रवास सुपरफास्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गाचे इलेक्टिकीकरण करण्यात येत असल्याने इलेक्ट्रिक इंजिनचा वापर वाढणार आहे.

त्यामुळे या मार्गावरील रेल्वेचा वेगही वाढणार असून एकेरी लाईनमुळे रेल्वेगाड्यांना होणारा विलंब कमी होणार आहे. दोन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापुर्वी कोपरगाव ते येवला या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता सोमवारी येवला ते अंकाई या 15 कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी होणार असल्याची माहिती रेल्वेचे विभागीय अभियंता सुध्दांशुकुमार यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसर्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे . सोमवारी होणार्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढला जाणार आहे. येवला ते अंकाई द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी मुंबई सर्कल रेल्वे सुरक्षा आयुक्त ए के जैन यांच्यासह  मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, मंडळ रेल्वे आयुक्त शैलेश गुप्ता, उपमुख्य अभियंता चंद्रभूषण,कार्यकारी अभियंता डी. पी. पाटेल, सेकंशन इंजिनइर सुद्धांसू कुमार,एक्झिकेटीव इंजिनइर वि. पी. पैठणकर आदी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post