सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं, छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


मुंबई, (दि.17 सप्टेंबर) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारने त्वरित दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलवण्याची विनंती या पत्राद्वारे केली आहे. मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींची आहे, असेही उदयनराजे यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

त्यावर तात्पुरता उपाय म्हणून सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. जेणेकरुन तामिळनाडूच्या धर्तीवर स्थगिती उठवून स्थगितीच्या आधीची अ‍ॅडमिशन व नियुक्त्या संरक्षित करण्याची कार्यवाही तातडीने होईल. 
 
 
खरं तर मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी सर्वच राजकिय पक्ष आणि लोकप्रतिनिधींची आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्वरित दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलवावे. जेणेकरुन मराठा समाजाला दिलासा देता येईल. या अधिवेशनात खालील महत्त्वाच्या विषयांवर आपल्या सरकारने गांभीर्याने विचार करावा असं मला वाटतं असे म्हंटले आहे.

 



Post a Comment

Previous Post Next Post