कोरोना काळात सामाजिक संस्थांचे काम प्रशंसनीय : पालकमंत्री हसन मुश्रीफ

महिलांसाठी गुरू अर्जुन कोविड केअर सेंटर सुुरू


नगर, (दि.19 सप्टेंबर) : कोरोनाच्या संकट काळात अनेक सामाजिक संस्था चांगल्या काम करीत असून, त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. खास महिलांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र असे 78 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. येथे महिलांना घरगुती वातावरणात उपचार मिळतील. याशिवाय त्यांना खेळण्यासाठी विविध गेम्स व साहित्य उपलब्ध असेल. राज्यात बहुदा अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असावा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रिफ यांनी केले.


घर घर लंगर सेवा, अ.नगर पोलीस, आय लव्ह नगर, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल ट्रस्ट, जैन ओसवाल ट्रस्ट व अ.नगर मनपा यांच्या वतीने फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या गुरू अर्जुुन कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री ना. हसन मुश्रिफ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 
 
 
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आ. संग्राम जगताप,महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा पोलीसप्रमुख अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपअधीक्षक संदीप मिटके, आयुक्त मायकलवार यांच्यासह घर घर लंगर सेवा ग्रुपचे सदस्य हरजितसिंग वधवा, जनक आहुजा, प्रिथपाल सिंह धुप्पर, किशोर मुनोत, राहुल बजाज, करण धुप्पर, सुनील छाजेड, राजा नारंग, सनी वधवा, जसीमीतिंसह वधवा, नारायण अरोरा, कैलाश नवलानी, प्रमोद पंतम, शरद बेरड, पुरुषोत्तम बेत्ती, जय रंगलानी, किशोर रंगलानी, दामोधर माखिजा, ला. धनंजय भंडारे, डॉ. सिमरन कौर वधवा आदी उपस्थित होते. हे सेंटर सुरू करण्यासाठी नरेंद्र फिरोदिया, रितु अ‍ॅबट, ईश्‍वर बोरा, सुनील थोरात, विपूल शाह, दिनेश चोपडा, पुनित भुटानी, बलदेव सचदेव, अमरजितसिंह वधवा आदीं बरोबर आहेत. स्वागत हरजीत सिंह वधवा यानी केले. 
 
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर अनिवार्य आहे. नियमांचे पालन केल्यास कोरोनाचे संकट लवकरच दूर होऊन जीवनान पूर्वपदावर येईल असा विश्‍वास व्यक्त करीत कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याचे सांगितले. नागरिकांनीही काही सिमटम्स आढळल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले.

जिल्हा पोलीसप्रमुख अखिलेशकुमार सिंह म्हणाले की, पोलीस प्रशासन कठोर पावलेे उचलत असून, मास्कचा वापर न करणार्यांवर कारवाई केली जात आहे. खास महिलांसाठी कोविड सेंटर सुरू झाल्याने महिलांची सुरक्षा राहील. सुमारे 78 बेडचे हे कोविड सेंटर असल्याने रुग्णांची चांगली सोय येथे होईल, असे सांगितले. 
 
आ. संग्राम जगताप म्हणाले की, नगरमध्ये मोठ्या संख्येने सामाजिक संस्था कार्यरत असून, त्या उल्लेखनीय काम करीत आहेत. महिलांसाठीचे हे कोविड सेटर देखील या संस्थांच्या पुढाकारानेच सुरू झाले आहे. राज्यात फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेले हे एकमेव सेंटर असून, हे सेंटर राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे सांगितले. महापालिकेच्या वतीने येथील मेडिकल व्यवस्था पाहण्यात येणार असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post