'गुरुजी आपल्या अंगणी' उपक्रमाद्वारे शिक्षकदिन साजरा

 


नगर, (दि.06 सप्टेंबर)  : गेले काही वर्षे सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक कार्यात विविध प्रयोग अनोखे उपक्रम याद्वारे हसत खेळत आनंददायी शिक्षण देण्याची सातत्याने धडपड करणारे वायकरवस्ती ता.पाथर्डी या शाळेचे उपक्रमशील शिक्षक पोपटराव फुंदे यांनी गुरुजी आपल्या अंगणी या उपक्रमाद्वारे अनोखा शिक्षकदिन साजरा केला.


गुरुजी आपल्या अंगणी या उपक्रमाद्वारे आज शाळेतील सर्व मुलाच्या घरी जावून शैक्षणिक साहित्यासोबत टुथब्रश वाटप करत शक्य तिथ लॅपटॉपद्वारे ई-लर्निंग अभ्यास घेवून एक अनोखा शिक्षक दिन साजरा केला.


शैक्षणिक साहित्यासह टुथब्रश हा मुलांच्या स्वच्छता व आरोग्याविषयी चांगली सवय लागणे, वृध्दिंगत होणे यासाठी खूप उपयुक्त ठरेल. शाळेत मुलांची स्वतः नख कापणे, जेवतांना एक घास मुलांसोबत घेणे, अनेक गरजू अनाथ मुलांच पालकत्व स्विकारणे, गरजू कुटुंबाला थेट मदत करणे उपक्रमातून मुलात मुल होवून जात विद्यार्थी पालकासोबत जिव्हाळ्याच नात निर्माण करणार्‍या फुंदे यांच शैक्षणिक व सामाजिक कार्य आजच्या काळात अनेकांसाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे, अशा शब्दात उपसभापती मनिषाताई वायकर यांनी या उपक्रमाच कौतुक केलं.


अशा उपक्रमामुळे विद्यार्थी व पालक यांच्या चेहर्‍यावरील आनंद समाधान हाच शिक्षकदिना निमित्त सर्वोत्तम सन्मान असल्याच पोपटराव फुंदे यांनी सांगितलं  सामाजिक बांधिलकी जपणार्‍या अनोख्या शिक्षकदिनाच सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post