नंदकुमार झावरे पाटील ग्रामिण विद्यार्थ्यांची अस्मिता : डॉ कोठारी

74 व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी संघटनेच्यावतीने 

 

एक हजार लोकांच्या शारिरीक प्राणवायू व तापमान मोजनीचा संकल्प

 


नगर, (दि.20 सप्टेंबर) : आज मुंबई, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर आदी ठिकाणी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी एकता मंचच्या वतीने राज्यातील जेष्ठ विद्यार्थी नेते तथा अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा.आ.नंदकुमार झावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

आज अहमदनगर जिल्ह्यातील छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे स्मायलिंग अस्मिताच्या वतीने झावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शारीरिक प्राणवायू आणि तापमानाची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाल अध्यक्ष म्हणून हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉ पारस कोठारी तर प्रमुख अतिथी म्हणून मॅक केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रशांत पटारे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात झावरे पाटील यांच्या नावाने बांबूच्या रोपांच रोपण करून व डॉ. प्रशांत पटारे यांच्या शारीरिक प्राणवायूची तपासणी करत झालीे.

अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ.कोठारी म्हणाले की भोंद्रे या पारनेर तालुक्यातील छोट्या गावातून एका सर्व सामान्य घरातील मुलानं त्यातही जून्या जमान्यातील शिक्षकाच्या मुलांने शहरात येऊन विद्यार्थी चळवळ उभी केली. राज्यस्तरावर विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले आणि महामंडळाच्या बसमधून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत डब्याची सोय राज्य सरकारकडून करून घेतली यावर हा विद्यार्थी थांबला नाही तर रशिया, जर्मनी स्वित्झर्लंड अशा देशांचे अभ्यास दौरे करून पुन्हा तालुका स्तरावर काम करत थेट आमदारकी संपादीत केली. या सर्व प्रवासाच नाव म्हणजे नंदकुमार झावरे पाटील.

आमदारकीच्या कार्यकाळात विधीमंडळात सतत 10 वर्षे काम करताना झावरे पाटील यांनी स्वताच्या नेतृत्त्वाखाली एक अभ्यासू आमदारांचा गट तयार केला होता. आजही ते राज्यातील शतकपुर्ती असलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारकचे अध्यक्ष पदावरून विद्यार्थ्यीभिमूख संस्था चालवत आहेत.एकूणच काय तर झावरे पाटलांचे संपूर्ण कार्य हे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी समर्पित आहे, झावरे पाटील हेच खरे ग्रामिण भागांतील विद्यार्थ्यांची अस्मिता आहे, असे प्रतिपादन डॉ.कोठारी यांनी केले.

दरम्यान मॅक केअरचे संचालक डॉ.प्रशांत पटारे यांनी देखील झावरे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कोरोना काळात घ्यावयाच्या दक्षता याबद्दल मार्गदर्शन केले.मॅक केअरचे सर्व सदस्य हे कशाप्रकारे लोकांना सेवा पुरवत आहे याबद्दल माहिती दिली. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने आज एक हजार लोकांच्या शारीरिक प्राणवायू आणि तापमानाची तपासणी केली जाते आहे आणि जर काही लोकांना लक्षणं दिसली तर आम्ही त्यांना उत्तम सेवा देत बरे करु असा आशावाद डॉ पटारे यांनी व्यक्त केला.

संघटनेच्या वतीने आज दिवसभर आरोग्यदूत म्हणून शेकडो वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर,चिखली गावचे सैन्य दलातील मेजर शिवाजीराव महाडिक, जन संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भोर, संभाजीराजे कदम आणि सर्व कार्यकर्ते तथा स्मायलिंग अस्मिताच्या वतीने सचिन सापते, धिरज कुमटकर, भाऊ निकम,अक्षय शेळके यांच्या नेतृत्वाखाली विविध शाळा, महाविद्यालय,बस थांबे परिसरातील व्यक्तींचे प्राणवायू आणि तापमानाची तपासणी केली.

दिवसभरात जवळपास एक हजाराहून अधिक व्यक्तींना याचा लाभ झाला आहे, शिवाय पाच ते सहा लोकांना प्राणवायूची तपासणी दरम्यान कमतरता दिसून आली अशांना सरकारी दवाखान्यात कोरोना चाचणी करून घेण्यासाठी सांगण्यात आलं आहे.अशी माहिती स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post