गोदाकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन
नगर-शेवगाव, (दि.09 सप्टेंबर) : जायकवाडी धरण हे 99 टक्के भरल्याने धरणाच्या 17 दरवाजापैकी 16 दवाजे अर्धाफुटाने उचलले आहेत. 9 हजार 973 प्रतिसेकंद विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. या पाण्यामुळे गोदावरी नदीत पुर परस्थिती निर्माण झाल्याने गोदाकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोदाकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले असून, स्थानिक पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाचे पाणी नाथसागरातच येत असल्याने रविवारी रात्री 10 वाजेदरम्यान धरणाचे आणखी आठ दरवाजे तातडीने अर्धा फुटाने उचलून गोदावरीत विसर्ग वाढविण्यात आला होता.
त्यामुळे धरणाच्या 12 दरवाजांतून गोदावरी पात्रात 6288 असा विसर्ग होत होता. आज पाण्याची आणखी आवक वाढल्याने धरणाचे 16 दरवाजे अर्धा फुटाने उचलून 8 हजार 384 क्यूसेक्स व जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्यूसेक्स, असा 9 हजार 973 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
जायकवाडीत दाखल होणार्या पाण्याच्या अंदाज घेऊन विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो.त्यामुळे गोदाकाठच्या गावांना पुराचा धोका संभावण्याची शक्यता असल्याने खबदारासाठी प्रशासनाने शाळा, मंगलकार्यालये, मठ ताब्यात घेऊन मुबलक प्रमाणात अन्नधान्य साठा राखव केला आहे.