लोकाभिमुख उपक्रम नागरिकांना दिलासा देणारे : सुमित वर्मा

सुमित वर्मा युवा मंचच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न 


नगर, (दि.08 सप्टेंबर) : सध्या कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाबरोबरच इतरही वैद्यकीय सुविधांवर त्यांचा विपरित परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी याचा एकत्रित मुकाबला करणे गरजेचे आहे. इतर रुग्णांना रक्ताचा भासत असलेला तुटवडा ही समस्या ओळखून  रक्तदानाचा उपक्रम राबविला आहे.  रक्त अभावी उपचारामध्ये  बाधा येवू नये यासाठी युवकांनी रक्तदान  केले पाहिजे. सुमित वर्मा युवा मंचच्यावतीने नेहमीच सामाजिक भावनांचा विचार करुन विविध उपक्रम राबविले आहे. त्यांचे लोकाभिमुख उपक्रम नागरिकांना दिलासा देणारे ठरतात. त्यांच्या उपक्रमास नागरिकांचाही प्रतिसाद मिळतो, असे प्रतिपादन सुमित वर्मा यांनी केले.

सुमित वर्मा युवा मंचच्यावतीने आनंदऋषीजी ब्लड बँक येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुमित वर्मा, गणेश ढोले, अभय कोटा, अनिकेत सियाळ, संकेत जरे, आकाश साळवे, योगेश गुंड, प्रकाश गायकवाड, राहुल वर्मा आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना सुमित वर्मा म्हणाले, राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसेच्या माध्यमातून आपण कार्य करत आहोत.  आपण पक्षीय राजकारण न करता समाजहित डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत. समाजाला आवश्यक असणार्‍या बाबींची पूर्तता करणे आपले कर्तव्य आहे. आज रक्तदानचा उपक्रम राबविला. त्यात युवकांनी मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहील. यापुढील काळातही आपले कार्य असेच सुरु राहिले, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास अमित सोनाग्रा, ओंकार काळे, सुधीर कळमकर, करण साळूंके, सागर भंडारी, निखिल साबळे आदि उपस्थित होते. मंचच्यावतीने शिर्डी, कोपरगांव आदि ठिकाणीही रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरासही युवकांचा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post