राज्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई, (दि.14 सप्टेंबर) : बंगालचा उपसागर, आंध्र प्रदेश, ओडिशालगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह अरबी समुद्रातील हवामान बदलामुळे पुढील चार दिवस राज्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.13 सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणाला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशीही शक्यता वर्तवली आहे.

याच काळात महाराष्ट्राच्या  किनारपट्टीवर ताशी 55 किमी वेगाने वारे वाहतील. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे पुढील आठवडाभर राज्यात मॉन्सूनचा मारा कायम राहील, असा अंदाज आहे.

 

हवामानाचा अंदाज

13 सप्टेंबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस. महाराष्ट्राच्या किनारी भागात सोसाट्याचा वारा. विदर्भासह लगतच्या प्रदेशात चांगला पाऊस.

 
14 सप्टेंबर : संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस.

15 सप्टेंबर : महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस.


16 सप्टेंबर : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस.
 

असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post