मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे


बीड , (दि.17 सप्टेंबर) : मराठा आरक्षण आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेत कायम आरक्षणाच्या बाजूने राहिलो आहे;  राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनेच असून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले जातील असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास भेट देऊन मंत्री श्री मुंडे यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून निवेदन स्वीकारले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या पूर्णपणे पाठीशी असून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तसेच अन्य न्यायालयीन प्रक्रियेसाठी कुठेही कमी पडणार नाही, असे यावेळी श्री. मुंडें यानी आंदोलकाना आश्वस्त केले.

यावेळी मराठा आरक्षणासह विविध  मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा, बीडच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post