नगर, (दि.01 सप्टेंबर) : नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त बसविण्यात आलेल्या पर्यावरणपुरक गणेश मुर्तीचे घरीच सजवलेल्या ड्रममध्ये विसर्जन करण्यात आले.
प्रारंभी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते उत्थापन पूजा करण्यात आली. यावेळी डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, कृष्णा डोंगरे, सोनू येवले, कार्तिक डोंगरे आदि उपस्थित होते.
पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती असून, ते चांगले ठेवणे प्रत्येक ग्रामस्थांची जबाबदारी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या विहीर, बारव आदी ठिकाणी विसर्जित केल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होते. हे जलसाठे दुषित करण्याऐवजी लाडक्या बाप्पाची पर्यावरणपुरक शाडूच्या मातीची गणेश मुर्ती घरातच विसर्जित करणे काळाची गरज आहे. पर्यावरणपुरक श्री गणेशाच्या विसर्जित केलेल्या शाडूच्या मातीपासून रोपे तयार करण्यात येणार आहे.
तर नवरात्रामध्ये महिलांना या रोपांचे वाटप करुन ते घराच्या अंगणात लावण्याचे आवाहन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त होणार्या इतर सामाजिक व धार्मिक कार्यक्रम रद्द करुन विद्यार्थी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदुषण मुक्तीचा संदेश देणार्या ऑनलाईन घरगुती देखावा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असल्याची माहिती पै.नाना डोंगरे यांनी दिली.