खरेदी-विक्री संघ हा शेतकऱ्यांचा दुवा आहे : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी सुरेश सुंबे व

व्हा.चेअरमनपदी छत्रपती बोरुडे यांची बिनविरोध निवड

 


नगर, (दि.08 सप्टेंबर) : शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास टाकून खरेदी-विक्री संघाची सत्ता दिली. या सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करा. सर्व संचालकांनी एक विचाराने काम करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे. कोरोना संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सर्वांनी करावे. खरेदी-विक्री संघ हा शेतकऱ्यांचा दुवा आहे. नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी सुरेश सुंबे व व्हाईस चेअरमनपदी छत्रपती बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते.

नगर तालुका खरेदीविक्री संघाच्या चेअरमनपदी सुरेश सुंबे व व्हाईस चेअरमनपदी छत्रपती बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले. समवेत चेअरमन अभिलाष घिगे, व्हा. चेअरमन संतोष म्हस्के, संचालक विलास शिंदे, बाळासाहेब निमसे, दिलीप भालसिंग, बाळासाहेब जाधव, संतोष बोथरा, बबन आव्हाड, बन्सी कराळे, रेवन चोभे, शिवाजी कार्ले, प्रा. संभाजी पवार, तुकाराम वाघुले, अंबादास बेरड, डॉ. अनिल ठोंबरे, लक्ष्मण नरवडे, अंबादास शेळके, श्रीकांत जगदाळे, ज्ञानदेव शेळके, केशव अडसुरे, रमेश आगरे, मीराताई बोठे, शारदाताई कराळे, आप्पासाहेब कुलट आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post