मराठा आरक्षणा संदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा अनिकेत कराळे यांचा इशारा

मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी

मराठा महासंघाच्या वतीने महसूलमंत्री यांना निवेदन

अन्यथा अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन 

करण्याचा अनिकेत कराळे यांचा इशारा


नगर, (दि.21 सप्टेंबर) :  मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले. आरक्षण प्रश्‍नी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झाले असून, सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यास अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा अनिकेत कराळे यांनी दिला आहे.
 

महसूल मंत्री थोरात एका कार्यक्रमानिमित्त नगर शहरात आले असता त्यांना निवेदन देण्यात आले. युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे, सचिव संतोष पागिरे, नगर तालुकाध्यक्ष नाना डोंगरे, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज गवांदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष बिभिषण खोसे, सुनिल चौधरी, रावसाहेब मरकड यांचे निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.
 

सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी मराठा आरक्षणाचा विषय घटना पिठाकडे सुपूर्त करताना जो स्थगिती आदेश दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे घटना तज्ञांचा व कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घेऊन सदरची स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर बाब अवलंबित करावी. मराठा आरक्षण खंडित होऊ न देता पूर्ववत चालू ठेवावे आदींसह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post