नगर, (दि.06 सप्टेंबर) : जिल्हयातील अकोले तालुक्यातल्या कुंभेफळ इथल्या बंद घराचे कुलूप तोडून घरात कपाटात ठेवलेले 50 हजार रोख आणि 1 लाख 10 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा सुमारे दिड लाखापेक्षा ऐवज चोरट्यांनी घरफोडी करुन लंपास केला आहे.
या घरफोडी प्रकरणी सुकदेव शांतीलाल तुंबारे (रा. कुंभेफळ, ता. अकोले, जि.अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटेनेचा पुढील तपास पोलीस नाईक पांडे हे करत आहेत.