‘त्या’ रुग्णालयांवर कारवाई का नाही ? : मनसेचे महापालिका आयुक्तांना निवेदन


नगर, (दि.04 सप्टेंबर) : शहरातील कोरोनाची परिस्थिती खूप भयंकर झाली असून कोरोना आजारावरील श्‍वसनांचे त्रास असणार्‍या रुग्णांना व्हेंटिलेटर ऑक्सिजन उपलब्ध होत नसून, खासगी रुग्णालयात दाखल करण्याकरिता पन्नास हजार ते एक लाख रुपयांची रक्कम डिपॉझिट घेतल्यानंतरच रुग्णांना दाखल करत आहे. त्यामुळे गरीब सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध होत नसून फक्त श्रीमंतांनाच हे खासगी रुग्णालयात उपचाराकरिता बेड उपलब्ध होत आहे. मात्र, गोरगरिबांवर उपचार करणार कोण ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना केला आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील सर्व बेडची माहिती प्रसिद्ध करावी तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेत हॉस्पिटल विचार करत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी तसेच हजारो लाखो रुपये डिपॉझिट मागणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई केली जावी, व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेडची शहरात संख्या वाढवावी, एक लाखांपेक्षा जास्त बील आकारणीत केलेल्या हॉस्पिटलवर कारवाई करावी, सरकारी दर पत्रकाप्रमाणे हॉस्पिटलने रुग्णांवर उपचार करावे, शहरात वाढीव बिलांच्या अनेक तक्रार येऊन देखील अजूनपर्यंत एकही हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही. याबाबत मनसे आणि जनतेची शंका असून महानगरपालिकेवरही संशय निर्माण होत आहे.

त्यामुळे ताबडतोब व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड उपलब्ध करावे तसेच डिपॉझिट घेणार्‍या व महात्मा  फुले जन आरोग्य योजनेत उपचारास टाळाटाळ करणार्‍या व डिपॉझिट घेणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई करावी महत्त्वाचे म्हणजे बेड वाचून कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये, या गोष्टीने काळजी घ्यावी अन्यथा लाखो रुपये डिपॉझिट घेणारे हॉस्पिटल, महात्मा फुले जण आरोग्यसेवा सेवेत उपचारास टाळाटाळ करणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई करणार नसाल तर मनसे रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आल्यास संबधित हॉस्पिटलवर धडक देऊन मनसेच्या स्टाईलने चौकशी करू व कारवाई करू, असा इशारा मनसेच्या नितीन भुतारे यांनी दिला.

यावेळी जिल्हा सचिव नितीन भुतारे, जिल्हाध्यक्ष मनसे सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, अमोल बोरुडे, तुषार हिरवे, विनोद काकडे, अंबादास गोटीपामुल, अ‍ॅड.अनिता दिघेे, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post