नगर, (दि.01 सप्टेंबर) : मढी येथील कांद्याची मागणी चांगली असली तरी यंदाच्या वर्षी कोरोना माहामारी रोगाच्या संकटाला तोंड देत पाथर्डी तालुक्यातील मढी, धामनगाव, करडवाडी, घाटशिरस परिसरात खरीप हंगामातील लाल कांदा लागवडीस वेग आला आला आहे. परंतू कोरोणाच्यामूळे मजुरांची परिसरात टंचाई भासत आहे.
मागच्यावर्षी कांद्याचे दर 20 रुपयांपर्यंत गेल्याने यावर्षी देखील अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले असल्याचे चित्र दिसत आहे. पाथर्डी रोडवरील मढी येथे सुमारे 200 हेक्टर हून अधिक कांदा लागवड पूर्ण झाली.
सप्टेबर अखेर 100 हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. मढी गाव खरीप हंगामातील लाल कांदा (नाशीक) पिकासाठी नगर जिल्ह्यात अग्रेसर असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात येथे लाल कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
मढी, धामनगाव, करडवाडी, घाटशिरस, निवडुंगे व परिसरात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे. कांदा लागवडीसाठी जून ते जुलै महिन्यात शेतकर्यांनी अल्पशा पावसावर व विकतचे पाणी घेत रोपवाटिका तयार केल्या, तर काही शेतकर्यांनी कांदा रोपे खरेदी करून लागवड करणे पसंत केले आहे.
रोपवाटिकांचे दरही यंदा अधिक असून, अधिक पैसे देऊनही कांदा रोप मिळणेही कठीण झाले आहे. तसेच मजुरीही वाढलेली आहे.